एका छोट्या खेड्यातल्या झोपडीत राहणाऱ्या एका माणसाची हि आत्मकथा.बायको ,आई
आणि एका मुलीसोबत राहण्याऱ्या त्या माणसाला पोटासाठी दुसऱ्या गावाला जावे
लागले.दिवस भर उन्हात बसून दगड फोडताना त्याची ओढ फक्त त्याच्या घराकडे असायची आणि
घरच्याच आशेपोटी तो तहान भूक विसरून काम करायचा.काम झाल्यावर बघितलेली स्वप्ने
पूर्ण करण्यासाठी उत्साहाने जेंव्हा तो घराकडे जातो....चित्र मात्र पूर्ण बदललेलं
होतं ...
गेलो व्हतो परगावी...
कष्ट फळवायापाई...
तान भूकं इसरून ..
जोडाया पैका संसारापाई...
गेला मास पुरा उन्हात..
व्हतं पाय अनवाणी..
केली चाळणी हाताची..
व्हती धोंडे फोडायची..
घामाघूम व्हते दिस..
व्हती रात इजांपाई...
जाई रात सारी सोशीत ..
वाट पहाटेची पाही...
तुकडा मोडायचो ज्यायेळी..
माय डोळ्यासमोर येई..
ल्योका आठवी तिची माया..
वाट पाही दारामंदी...
चिमुकली पोर माझी ..
इवूला घास तिले लागे..
नाही बाप तिचा धनी ..
तोही घास लेकरू मुके..
व्हतो उतावीळ एका राती..
उद्या जायीन म्या घरी..
बाय होईल माझी येडीपिशी
भेटेल तिला तिचा धनी..
खायील मिर्चू भाकर मायेची..
झोपेल आराम झोपडी मंदी..
खेळेल लेकरा संग माझ्या..
भरवेल तिले घास...
दुरून दिसले गावं देवूळ..
कळस वर डोकावू पाहे..
एक घर दिसेना त्याच्या संग...
पाण्याखाली व्हत पुर गावं...
आलो आलाड म्या जेंव्हा...
फक्त व्हते पाणी बोलत..
पुसे कशापायी तू आला..
गेले समदे तुझे वाहत....
व्हावून गेली माझी माय..
गेली तिच्या संगे माझी बाय...
चिमुकली हरवली सदाची..
आली काळरात्र नशिबात...
व्हते नव्हते समदे गेले..
फुटलं नशीब कस माझं..
उरलं मागे आता देवा..
फक्त पडकं झोपडं माझं....
झोपडं माझं....
Reviewed by Akshay
on
11:13 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....