राज्य-राज्य, जात-जात, धर्म-धर्म, किंवा भाषा-भाषा करणाऱ्या
गल्लि पासून ते दिल्लिपर्यंतच्या नेत्यांना विचारा, परराज्यातल्या,
जातीतल्या, परधर्माच्या किंवा भाषेच्या माणसाने
यांना मरताना
पाणि पाजवले तर हे नाही पिणार का ?
·
महाराष्ट्रात , माझा महाराष्ट्र-माझा महाराष्ट्र
म्हणून रडणारे आहेत जे उत्तर भारतीयांच्या नावानी रडतात आणि लोकांना
प्रांतवादाचे धडे देतात.
·
तमिळनाडु
मद्धे तमिळ भाषेच्या नावानी रडनारे आहेत जे हिंदी भाशिकांचा तिरस्कार करतात. राजकारणी
लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदी भाषेच्या प्रचाराची आणि शिक्षणाची बंदी
केली. जेनेकरून तमिळ भाषेतर राजकारण्यांना इथे प्रचारासाठी किंवा राजकीय पक्ष स्थापनेसाठी संधी मिळू नये .
·
आणखी
कुणी मी हिन्दू-मी मुस्लिम च्या नावानी रडत आहेत. धर्माच्या शिकवण्यांचा चुकीचा अर्थ लावून धर्मा धर्मात
फुट पडण्याचा प्रयत्न करत असतात. यात हिंदू-मुस्लीम वादाला उत्तेजना देणार संखेने
जास्त आहेत.
·
आत्ताच
कुणीतरी अशाच कोणत्यातरी कारणामुळे एका
राज्याचे दोन तुकडे केले.या फाळणीची गरज का पडली ? फाळणी कुणी केली ? या दोष्टी
माझ्या विषयाच्या मर्यादेत येत नाहीत.
या
सगळ्यांना देश्याच्या
सीमेवर लढ़नाऱ्या सैनिकाची जात, भाष्या, धर्म,
राज्य माहित आहेत का ? त्यांच्यासाठी घरामध्ये दुय्यम कामे करणारा कोणत्या जातीचा आहे
माहित आहे का? रस्ते झाडणारा, दुकानदार, ड्राइवर्स, सिनेमातले नट, संगीतकार आणि इतर कलाकार, देशस्तरीय खेळातले
खेळाडू, होटल्स,
दुकाने, दवाखाने, इत्यादी ठिकाणी काम करणारे कोण आहेत माहित आहे का ? मग हा सगळा प्रांतवाद
, जात-धर्म वाद नेमका माणुसकीच्या धड्यामध्ये कुठल्या कारणासाठी उल्लेखला जातो ?
हद्द म्हणजे
एकाच धर्मामध्ये उदाहरणार्थ हिंदुमधल्या वेगवेगळ्या जातीत फुट पडण्यासाठी काही लोक
आहोरात्र प्रयत्न करताना दिसतात. जातीवादाला प्रवृत्त करणारी पुस्तके , लेख ,
भाषणे देऊन लोकांच्या मनात वेगळेपणाच्या भावनेला उत्तेजित करतात. हे कधी पर्यंत
चालेल ? अजूनसुद्धा गावो गावात लोकांना स्वतःच्या आत्मसम्माणासाठी लढे द्यावे
लागतात. अजूनही लोकांना त्यांच्या जातीवरून, राज्यावरून किंवा भाषा-धर्मावरून
ओळखले आणि वागवले जाते.
राजकारणाचा या वादामधला
हस्तक्षेप तर कळसाचा असतो. नेते स्वार्थासाठी समाजामधल्या वेगळेपणाचा आणि
विभिन्न्तेचा फायदा घेतात. जाती-धर्माला वेगळे करणारे पक्ष काढून मतांना फोडले जाते. ठराविक लोकांचे
गट पडून मत मिळवले जाते.
परिणामी या
सगळ्याचा प्रभाव देश्याच्या प्रगतीवर, एकतेवर होतो..हे चालू राहिले तर देशाचे
हजारो तुकडे होऊन देश कमकुवत होईल. अश्या कमकुवत देशाला इतर देशापासूनचा खतरा
वाढेल. आणि सगळ्याचा प्रत्यक्ष परिणाम होईल आपल्या दैनंदिन जीवनावर. या पडलेल्या
तुकड्यांमध्ये सतत वाद चालू राहातील आणि “भारताच्या विविधतेतील एकता स्वरूपातील
संस्कृतीचा सूर्यास्त होईल.”
चला या “जात ,
धर्म , भाषा , प्रांत”वादाला लवकरात लवकर संपवू.....
जय भारत...!!!
सीमोल्लंघन "जाती , धर्म , प्रांत आणि भाषा " वादाचे..!!
Reviewed by Akshay
on
10:54 PM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....