कॉलेज नंतर (२०१२) Design Engineering च्या ट्रेनिंग साठी Bangalore ला असताना तमिळनाडू मधल्या होग्गेनिकल या पर्यटनस्थळाला भेट दिली.
होग्गेनिकल म्हणजे “ROJA” या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या शुटींग मध्ये दाखवलेले ठिकाण. Bangalore पासून ९०-१०० km वर असलेले हे ठिकाण एक ते दोन दिवसाच्या सुट्टीसाठी निवडले जाऊ शकते. त्यातल्या त्यात मासे खाणाऱ्यांसाठी हि जागा जास्त चांगली आहे. “ टिपिकल तमिळ ठिकाण” असे या ठिकाणाला म्हणता येईल .ते म्हणजे मासे खाणारे लोक , मास्यांपासून तयार केलेल्या तेलाची मालिश अश्या गोष्टी येते पाहायला मिळतात.
या ठिकाणचे विशेष म्हणजे इथली डोंगरांमधून वाहणारी नदी. या नदीमध्ये पावसाळेतर ऋतू मध्ये लाकडाच्या गोल होडीतून चक्कर मारणाऱ्यांची गर्दी असते....तमिळ ठिकाण असल्याने नक्कीच बाहेरच्या प्रवाश्यांची लुट होते. याच गोल होडीच्या २० ते २५ मिनिटाच्या फेरी साठी प्रत्तेकी ८०० रुपये घेतले जातात !!
होग्गेनिकल (Hoggenikkal) , तमिळनाडू.
Reviewed by Akshay
on
10:37 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....