अगले जनम मोहे बिटिया न कीजो....



शांत रस्ता ..संध्याकाळ ...बंद चालू होणारा खांबावरचा दिवा...घराकडे परतणारी मुलगी...एकटी...घाबरलेली...पाठलाग करणारे गुंड...

कल्पना करा या प्रसंगाची...सर्वांना माहित आहे पुढे काय होईल....
आपण आपल्या आई बहिणींनसाठी हाच एक मार्ग सोडलाय का ?
Is this all what they Deserve ?? पुरुषप्रधान असलेल्या या संस्कृतीत भारतीय स्त्रीचे अस्तित्व धोक्यात येत आहे का ? स्त्रीच्या स्वातंत्र्याचा विचार कितीजण मनापासून करतात ? या आणि अश्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मला शोधायची आहेत...

जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारतीय संस्कृतीचे आपण वारस आहोत.या संस्कृतीत स्त्रीला खूप मानाचे स्थान दिले आहे.पण याच स्त्रीवर ,तिच्या स्वातंत्र्यावर ,तिच्या अस्तित्वावर काळाची सावली पडत आहे असे आपल्याला नाही वाटत का ?
दिवसेंदिवस मुलींवर होणारे अत्याचार वाढत आहेत..पण ज्या लोकांना याची जान आहे ते यावर का प्रतिक्रिया दाखवत नाहीत ?
 आपण आपला राग फक्त facebook वर photo share करने  , आपल्या personal blogs वर अगदी प्रभावी भाषेत एखादी post लिहिने , इतक्यापर्यंतच मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात का दाखवत नाही ?..facebook आणि blog च्या post नि जर अश्या समस्या संपवता आल्या असत्या तर मी नक्कीच अश्या post ची company टाकली असती..पण जर खराच विचार केला तर या समस्या संपवण अगदी तितकच सहज आहे जितक्या सहज आपण facebook वर सहानुभूतीची post टाकतो...आपण जर स्वतःचाच विचार केला तर किती मुलींना आपण अगदी स्वच्छ नजरेने पाहतो ? आपल्या मनात एखाद्या एकट्या मुलीला पाहून खरच हा प्रश्न पडतो का कि ती कुठल्या अडचणीत असेल ?..नाही अजिबात नाही...facebook वर मोठ्या रुबाबात सहानुभूतीची post share करणारे आपण प्रत्यक्षात अगदी खालच्या पातळीचा विचार करतो...

काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या दामिनिसोबत झालेलि अमानुष घटना ऐकल्यानंतर अंगावर अगदी सहज शाहारे येतात..पण हि घटना पहिल्यांदा झालेली नाही...अश्या घटना रोज होतात..यापेक्षाहि अमानुष आणि राक्षसी.पण ते प्रकार आपल्या समोर येण्यापुर्वीच त्या मुलीचा जीव घेतला जातो. आपल्यासारख्या सुशिक्षित आणि जाणकार लोकांचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नसेल तर विचार करा समाजात जे नराधम आहेत ते किती सहज पणे अश्या घटना घडउन आणतात.
या सर्वांची सुरवात होते आपल्यापासून , आपल्या विचारांपासून..
अश्या बालात्कारींच्या मागे नक्कीच एकाचा हात नसतो..
पूर्ण समाज,त्याचे मित्र आणि इतर सर्वजनही त्याला कारणीभूत असतात.

BEHIND EVERY RAPIST.
- is a Father who treated his wife as a slave.
- is a Mother who meekly followed her husband’s whims.

- is a Sister who kept quite or even supported her brother who harassed other girls.
- is a friend who thought it is cool to tease a girl and even cooler to rape her.
- is a Grandmother who sees her new-born Grand-daughter and gets depressed.
- is In-laws who harasses their daughter-in-law­ for dowry.
- is Education System which offers advanced courses of Physics, Chemistry and Biology but doesn’t offer basics on sex education.
- is a Novel which portrays weakness of a woman as her sacrifice for her family and her meekness as a virtue.

- is a Patriarchal System which preaches that woman has little to none rights in decision-making­.
- is a Politician who thinks that child marriage will solve the rape problem.
- is a Lawmaker who came up with biased laws against the victim.
- is a Legal System which has a provision for rape victim to marry her rapist.
- is a Society which over-rates sex and takes pride in depicting woman as a sexual object.

लहानपानापासून मुलगा आणि मुलगी यांमध्ये होणारा भेदभाव हा कालांतराने मुलामुलींच्या मनावर स्पष्टपने उमटलेला दिसतो.आपल्याकडे मुलांच्या आणि मुलींच्या स्वातंत्र्याचा जर विचार केला,माझ्यामते तर मुलिंचे स्वातंत्र्य हे मुलांशी तुलनात्मकच नाही .एखादा मुलगा घराबाहेर कुठेही राहू शकतो ,कुठेही काहीही खाऊ शकतो ,कुठेहि थांबून बोलू शकतो ,रस्त्यावर कुणालाही हाक मारू शकतो , कुठलाही व्यवसाय करू शकतो , रात्री कितीही वेळ फिरू शकतो , कसेही कपडे घालू शकतो ,  अनोळखी माणसालाही सहज बोलू विचारू शकतो , कोणतेही व्यसन करू शकतो मोठ्यांनी हसू शकतो ,कुठलेही खेळ खेळू शकतो.....पण याच सर्व गोष्टी एखादी मुलगी कसलाही विचार न करता करू शकत नाही...इतक्या बंधनात राहूनही तिला याची खात्री कधीच नसते कि ती सुरक्षित आहे...बंधंनात राहूनही तिला समाजातील नराधमांच्या भीतीखाली राहावे लागते....
पण असे कितीदिवस चालेल ?? सर्वात प्रबळ लोकसत्ता असलेल्या या भारत देशात आपल्या स्त्रीयांना स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी का द्यावा लागत आहे ?...परत या प्रश्नाची उत्तरे येऊन थांबतात आपल्यावर , आपल्या विचारांवर...जर आपण आपल्या विचारांना बदलू तर देश नक्की बदलेल...

स्त्रियांच्या आई , बहिण , मुलगी , पत्नी , शिक्षिका या सुंदर साध्या , सरळ नात्यांना आपण ओळखायला जर वेळ लावला तर नक्कीच मुली म्हणतील

आगले जनम मोहे बिटिया न कीजो....
अगले जनम मोहे बिटिया न कीजो.... अगले जनम मोहे बिटिया न कीजो.... Reviewed by Akshay on 10:50 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.