प्रजासत्ताक लोकशाही कि पैसासत्ताक राजकारणशाही ??

आज भारताचा प्रजासत्ताक दिवस  . ६४ वा प्रजासत्ताक दिवस . अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणालाही माहित असलेली या दिवसाची एका ओळीत असलेली ओळख म्हणजे “ ६४ वर्ष्यांपूर्वी प्रजेच्या हातात सत्ता आलेला दिवस ”
पण हि सत्ता खरच आपल्या हातात आली होती का ?
६४ वर्ष्यांपासून प्रजासत्ताक असलेल्या या देश्यामध्ये आजपण सरकार पैश्याच्या आणि लोक पोटाच्या मागे धावताना दिसतात. धर्म , जात , भाषा , वर्ण , प्रदेश , या आपल्याच गोष्टींसाठी आपल्यामध्ये आग ओकणारे राजकारण आज ६४ वर्ष्यानंतरही आपली मान ताठ ठेउन चालताना दिसते. राजकारणी नेते कुत्र्या मांजराचा खेळ खेळत आहेत , मंत्री मंडळातील मंत्री वेतन वाढीच्या पुढच्या ठरावाची वाट बघत आहेत. शहरातील आणि गावातील नेते स्वतःची होईल तितकी मोठी प्रतिमा सार्वजनिक ठिकाणी चीटकावण्याचा प्रयत्न करीत आहेत , उच्चस्तरीय पदाधिकारी करोडोंची घोटाळे करीत आहेत , renovation  च्या नावाखाली अर्धी दफ्तरे पैसा काढत आहेत. सामान्य माणसे दोन वेळच्या जेवणाची तयारी करत आहेत , विध्यार्थी आभ्यासांचे कोरडे धडे घोकत आहेत , शेतकारी मरत आहेत , आणि आपण मात्र निपचित या सगळ्यांकडे पाहत आहोत.
आपल्याला याची सवय झाली आहे. घरात बसून वर्तमानपत्र आणि बातम्या बघताना काय काय होऊ शकतं याची बसूनच निंदा करण्याची आपल्याला सवय लागली आहे . आपण या दुषित वातावरणाची सवय लाऊन घेत आहोत . खरेतर आपण भारतीय लोक घाबरतो , पैश्याला . आपण घाबरतो सत्तेला . आणि कदाचीत जर घाबरतहि नसू तर आपण स्वतःचा विचार करण्यात इतके बुडून गेलोय कि देशाचा विचार करायला कुणाला वेळच नाही.
देशाचा विचार करणे हे आपले काम नाही असे जर प्रत्येकालाच वाटले तर देशाचा विचार करणार तरी कोण ?  थोड्यावेळासाठी आपण म्हणू कि देशाचे नेते देशाचा विचार करतात...पण खरेतर या थोड्या वेळासाठी सुद्धा देशाचे कितीतरी नेते काय करीत असतील माहित आहे ? नविन घोटाळ्याची तयारी करत असतील, जुन्या घोटाळ्यांची पुरावे मिटवित असतील, प्रतीपक्ष्याच्या नेत्यांवर टीका करत असतील , कोठेतरी भाषण देत असतील , कोणत्यातरी
foundation च्या नावाखाली सरकारकडून पैसे काढत असतील..आणि मग वेळ उरलाच तर दिखाव्यासाठी राष्ट्र प्रेम दाखवत असतील.
सुजलाम सुफलाम अश्या पवित्र भारताची पैसासात्तक राजकारणशाही अशी ओळख आपल्याला जगाला दाखवायची नाही.जगभरात सांस्कृतिक ज्योत तेवत ठेवणाऱ्या भारताला आपल्याला असा दिवस दिसू द्यायचा नाही. लाच खाणाऱ्या हवरट नेत्यांच्या हातानी हा देश विकू द्यायचा नाही. जात आणि धर्माच्या विविधतेतील एकतेला तडे जाऊ द्यायचे नाहीत . जागतिक शर्यतीत भारताला हरवायचे नाही . हि हार तेंव्हाच होते जेंव्हा तुमच्या आणि माझ्या सारख्या सामान्य माणसाची हार होते. आणि हि हार फक्त आणि फक्त सध्या चालू असलेल्या राजकारणातून होतेय. हि हार आहे तुमच्या आणि माझ्या आत्मविश्वासाची , हि हार आहे सार्वजनिक हक्कांची, हि हार आहे जहाल विचारांची , हि हार आहे मुलभूत हक्कांची , हि हार आहे लाच खाऊ न देणाऱ्या प्रवृत्तीची आणि हि हार आहे एका खऱ्या भारतीय मनाची .
भारताची जगाच्या पाठीवर वेगळी ओळख आणि अस्तित्व आहे. भारत शब्दातच परंपरा ,संस्कृती आणि मायेची उब आहे . आता खरीच वेळ आली आहे कि भारताच्या चिंतेचे ओझे दुसरा कुणीतरी घेण्यास येईल याची वाट न बघता आपणच समोर यावे . रोजच्या धावपळीत क्षणभर तरी आपण भारतीय आहोत याचा विचार आणला पाहिजे. भारताच्या विजयाचा आनंद नुसता cricket match पुरता मर्यादित न ठेवता तो सगळ्याच गोष्टीत अनुभवला पाहिजे . भ्रष्टाचार आणि पैसासत्ताक राजकारणशाही विरूद्ध पुढे आले पाहिजे . कोणाचीही वाट न बघता स्वतःच जबाबदार नागरिक असल्याची ओळख दुसऱ्याना पटउन दिली पाहिजे.
उच्च शिक्षण घेतलेले आपण , चांगले विचार असणारे आपण , वाईट परिस्थितही स्वतःला ताठ मानेने उभारणारे आपण , स्वाभिमानी आपण , आणि देशप्रेमी आपण राजकारणाच्या या कपटी शिकारीचे शिकार बनत आहोत . समाजाला आणि जगाला राजकारणाच्या डोळ्यांनी पाहत आहोत . हे सर्व थांबू शकते . आपण हे थांबवू शकतो . आणि हे तेंव्हाच होऊ शकते जेंव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्वाला पैश्यासाठी , सत्तेसाठी विकणार नाही . जाती धर्मातील अंतराला विविधतेतील एकता या शिवाय कोणत्याही दृष्टीने पाहणार नाही . समाजातील कोणत्याही घटकाच्या हक्कांना हिरावून घेणार नाही . राजकार्णींच्या घृणास्पद मायाजालात स्वतःला फसू देणार नाही.
आणि हे जर सर्व व्यवस्थित राहिले असते तर आज ६४ वर्ष्यानंतरही माझ्या सारख्या एकाला खरच प्रश्न पडला नसता कि हि प्रजासत्ताक लोकशाही आहे कि पैसासत्ताक राजकारणशाही .



भारत मत कि जय !!
वंदे मातरम !!



प्रजासत्ताक लोकशाही कि पैसासत्ताक राजकारणशाही ?? प्रजासत्ताक लोकशाही कि पैसासत्ताक राजकारणशाही ?? Reviewed by Akshay on 1:25 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.