विरह...




भिजूनही गेल्या वाटा , गेला वसंतहि सरून..
सखी तुझ्या आठवणी , गेल्या नाही अजून ...

अबोल हि रात्र सारी , जातो दिवसही अबोल..
मनात असत फक्त , तुझे गोड बोल...

बागा दिसतात उजाड , भासतो रसता सुनाट..
होतीस तू आधी संगे , आता वाटे सारे भानाट ..

स्वप्ने पडतात आताही , फक्त दिसतो विरह..
रस्ते लांबले सारे , आता थांबलाही प्रवाह..

रात्र खाते मनालाही , जीवा लागे हुरहूर..
नको असतानाही , गेलो असा दूरदूर..

भासतो तुझा स्पर्श असा , मना लागतात चटके..
मन रडत राहाते , बोले नशीब फुटके..

कधी होईल पहाट , जाईल एकांताची सावली ...
कधी वाटेल दिस माझा , वेळ होईल आपली ..

आहे चेहरा तुझा डोळ्यासमोरहा उभा ...
डोळे उघडू कसे , बाहेर वाटेना हि शोभा ..

स्वप्न होते तुझे लहानगे , होत्या लहानग्या आशा ..
हरपली सारी आशा आता , गेल्या अंधारून दिशा ..

पाणी दाटले डोळ्यात , खळखळ| वाहू पाहे ..
ओघळ प्रेमाचा असा मग , गालावरून ग वाहे ..

आवाज तुझा मला , उगाच का येतो ...
वाटे आहेस तू इथे , पण एकटा मी राहतो..

चंद्र दिसता मला आता , धडधड अशी होते ..
सखी  रूप तुझे गोरे , ज्याहून प्रिय होते..

रात्र वैरी झाली माझी , वैरी झाला हा आरसा ..
नाही चंद्र आता माझा , ना चेहरा हा असा ..

गेले ते सारे क्षण , गेलीस तुही त्याच्या संगे ..
झालो एकटा सदाचा , जगतो आठवांनी संगे..   
विरह... विरह... Reviewed by Akshay on 8:32 PM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.