आज यंदाचा पहिला पाऊस पडला...




आज यंदाचा पहिला पाऊस पडला...
मातीचा गंध क्षणात हवेत पसरला....
गार हवेच स्पर्श अंगा अंगा वर धडकला..
पक्षांचे थवे जमिनीवर उतरले...
झाडांची हिरवळ चमकू लागली...
पत्रांवर पावसाची रपरप वाढली...
बेडकांची हजेरी लगेच जाणवली...
रस्त्यावर गाडीवरून भिजनाऱ्यांची गर्दी झाली...
जवळच्या टपरीतून उकळणाऱ्या चहाची वाफ हवेत पसरली..
गरम कांदेपोह्यांची आठवण आली..
चिमुकल्यांचा चिखलातला खेळ सरु झाला...
अर्धवट भिजलेल्यांची पळापळ सुरु झाली...
रंगीबेरंगी छत्र्या रस्त्यावर चालू लागल्या...
मनातला मोर पिसारा फुलवू लागला...
मन अगदी चिंब भिजून गेले....
सगळीकडे फक्त पाऊसच बोलू लागला...
मी मात्र शांतच होतो...
निपचित भिजत उभा होतो..
एकटक सरींकडे पहात होतो....
तिला आवडणाऱ्या या पावसाने , परत तिची आठवण करून दिली होती....
तिच्याशिवाय मी एकटा असल्याची , जाणीव करून दिली होती..
तिला पाऊस आवडतो आणि मला ती , याची पुनरावृत्ती झाली होती...
आज यंदाचा पहिला पाऊस पडला... आज यंदाचा पहिला पाऊस पडला... Reviewed by Akshay on 8:04 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.