मराठी...!! माय मराठी...!!!

 
मराठी...!! माय मराठी...!!!

नावातच किती आपलेपण आहे...

नवीन लेख , नवीन नवीन लेखक , हजारो कविता , एखाद जून पुस्तक , त्यातल्या लेखकानी शब्दांना दिलेले वळण , मराठी भावगीते , तुकारामाचे अभंग ,ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणि इतर मराठी साहित्य बघताना नक्कीच मराठीच्या विस्ताराच्या व्यासाचा अंदाज लागतो.. ..
काल असच नेहमीप्रमाणे facebook वर नवीन माणसे शोधताना काही मराठी माणसे भेटली...त्यांची लेख वाचायला भेटले..त्यानंतर माझ्याजवळ असलेल्या मराठी गाण्याच्या संग्रहातून काही गाणे ऐकायला मन केल.....
बराच वेळ मराठीच्या दुनियेत फिरून मन अगदी मराठीमय झाले....
शाळा , मराठीचे पुस्तक , बनशेळकिकर  बाई अठवल्या....

आणि असच वाचत असताना माझ्यासारखा एका मराठी माणसाला ती मराठी 

"अलंकाराने नटलेली , पूर्ण मायेचा पदर घेतलेली , नाकात संस्कारांची नत घातलेली , कपाळावर तेजाच आणि प्रखरतेचं प्रतिक असलेलं कुकू लाऊन , सौन्दर्याच प्रतिक असलेल्या गालावरच्या खळीला लपवत लाजणाऱ्या मराठी मुलीसारखी वाटली..."
मराठी...!! माय मराठी...!!! मराठी...!! माय मराठी...!!! Reviewed by Akshay on 3:18 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.