परिसाच्या शोधात...

बदल हि एकच गोष्ट सर्वात जास्त नियमित आहे असे म्हणतात.(CHANGE IS THE ONLY CONSTANT)
वेळेसोबत सगळे काही बदलत जाते...माणसेपण बदलतात...आपल्या या प्रवासात खूप जन संपर्कात येतात आणि वेळेसोबत दुरावले जातात..नको असतानाही जवळच्या मित्रांचा वेळेसोबत त्याग करावा लागतो..
हा त्याग चिरंतर नसून तात्पुरता असला तरी तो अनपेक्षित असतो...असाच कोणीतरी एक  मित्र आपल्या जीवनात पण असतो...आणि वेळेसोबत दुरावला जातो.आयुष्यात येणाऱ्या आणि परत जाणाऱ्या अश्या प्रत्येक  मित्राला शोभणारी हि कविता....

उंच झेप तुझी पाखरा..
परत तरि तू येशिल का.
शुभ्र जरी त्या आकाशातुनी
घरट्याकड़े तू पाहशील का?

नविन हे रस्ते नविन जरी का वाटा.
प्रवास परतीचा तु करशील का?
नवी भरारी नवी दिशा ही.
जुने स्नेह तू भुलशील का?

स्वैर जरी का तू ठेव मनाशी..
आठवणीतुन तू चुकशील का?
बंध जुने ते होत प्रितीचे..
तोडून तयास उगाच असा तू
उडशील का?

भव्य जरी का ते स्वप्न तुझे.
लहान माझ्या आशा पाहशील का?
झेप तुझी त्याच दिशेने..
सांग परत तू येशील का?

परप्रांता असा जाऊनि..
बंध माझे तोडशील का ?
कोण होइल तुझे रे वेड्या.
सांग एकटा तू होशील का?

धाव घेता यशा पलीकडे..
गणित तू हे चुकशील का?
परिसाच्या शोधत असा तू
सोने तुझ्या पासचे मुकशील का?


परिसाच्या शोधात... परिसाच्या शोधात... Reviewed by Akshay on 8:31 PM Rating: 5

1 comment:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.