“अक्ष्या निघ लवकर , OFFICE ला उशीर झाला”..


मी काही कवी नाही किंवा लेखक पण नाही..
मोडक्या शब्दात जे आठवत जातं ते कागदावर येतं..
ऑफिसात वेळ असताना अशीच केलेली हि एक कविता..





दुरूनच पाहिलं मी , ती जवळ येत होती.
पहिल्यांदाच बाहेर ती  , एकटी दिसत होती.
       सकाळ तर बुआ, नेहमीसारखीच होती.
       तशी खास सुट्टी पण न्हवती.
       पण ‘हि’ का रस्ता चुकली होती ?
जवळ येताच तिने , मला केला इशारा (२)
नि कशाचं काय राव , अंगा अंगावर आला शहारा..
       लगेच गेलो मी जवळ , घाबरत घाबरत .
       बोललो तसे चार शब्द , कळत नकळत ..
बराच वेळ झाला गप्पच होती बसली..(२)
मधेच माझ्याकडे पाहून , लाजतच हसली..
       टवकारले मी कान , वाटले बोलेल ती आता तरी काही..
       उचलले डोळे , वाटले खुनवेल टी आता तरी काही..
हसतच होती नुसती , माझ्याकडे पाहून..
ठोक्यांना माझ्या , जास्त गती देऊन..
       “बस्स झाले आता हसणे”, असे म्हणले पाहावे बोलून..
       वाटले उगाच सगळा MATTER बिघडेल , असे काही बोलून ..
बराच वेळ झाला , न्हवते जवळपास कुणी ..(२)
खात्री झाली मनात ,कि एकटेच होतो आम्ही..
       मग झाला खरा लोच्या ,
       जेंव्हा धरला मी तिचा हात (२)
       डोकं आलं ठीकान्यावर ,
जेंव्हा ROOM MATE नि घातली लात.
धप्पकन पडलो पलंगावरून ..
मोडली मान आणि पाठ (२)..
बघतो तर काय उठून ..
सकाळचे वाजलेत पाऊणे आठ..
       कसली ती बाग अन कसला तिचा हाथ.
       कसली ती बाग अन कसला हो तिचा हाथ..
       स्वप्नात झाली मज्जा पण खाल्ली फुकटची लाथ..
नको रे बाबा परत तिचं येणं अन लाजून हसणं ..
नको ते इशारे अन नको एकांतात बसणं..
       तितक्यात आवाज आला..
       “अक्ष्या निघ लवकर , OFFICE ला उशीर झाला"..
“अक्ष्या निघ लवकर , OFFICE ला उशीर झाला”.. “अक्ष्या निघ लवकर , OFFICE ला उशीर झाला”.. Reviewed by Akshay on 9:11 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.