English version of this article
Who holds it responsible for evolution of life on Earth? Is that Hinduism or Christianity or Simply The Science?
अश्यातच माझी एका माणसासोबत भेट झाली ज्यासोबत
काही धार्मिक गोष्टीवर मतमांडणीचा योग आला. धार्मिक गोष्टींवर वाद-विवाद करण्याची
हि नक्कीच माझी पहिली वेळ न्हवती. विज्ञान आणि तंत्रज्ञानात माझा रस असून सुद्धा
अश्या काही गोष्टी आहेत ज्या मला “देव” नावाच्या सर्वश्रेष्ठ शक्तीत विश्वास
ठेवायला भाग पडतात. आणि त्याच गोष्टी मला अशा वादविवादांचा प्रखर प्रवक्ता बनायला
भाग पाडतात.
धार्मिक
गोष्टीवरील वाद हे अमर्याद तर आहेतच पण त्या वादाचा खरा तात्पर्यरुपी आशय त्या
अमर्याद वाद कर्त्यांना कधीच समजत नाही. माझा त्या व्यक्ती सोबत झालेला वाद सुद्धा
अशाच प्रकारचा होता जो नक्कीच कुठल्या तात्पर्यावर पूर्ण होऊ शकला नाही. माझ्या
आशेप्रमाणे शेवट पर्यंत त्या व्यक्तीच माझ्याशी सहमत झालाच नाही. उलट, शेवट पर्यंत
तो जगाच्या उत्पत्तीच श्रेय त्याच्या धर्माच्या देवांना देत राहिला (म्हणजे ,
ख्रिश्चन धर्माच्या देवतांना) आणि मी प्रतिपक्षी माझ्या धर्माच्या देवतांना
(म्हणजेच हिंदू धर्माच्या देवतांना )
वादाची
सरुवात त्यानी मला विचारलेल्या एका साध्या प्रश्नावरून झाली , “तुझा देवावर्ती
विश्वास आहे ?” ज्याला माझ अगदी चटकन “हो !” असं उत्तर होतं. माझ्याप्रमाणे तो पण
आस्तिक होता (देवावर विश्वास ठेवणारा). लगेच त्यांनी मला देव शब्दाची व्याख्या आणि
देवावर माझा विश्वास असल्याचे कारण विचारले. मी यावरती दिलेले उत्तर अगदी सरळ होते
जे माझ्या कडून पाठ करून घेतलेले किंवा शिकवलेले नव्हते तर ते माझ्या स्वतःच्या अनुभव
आणि वाचनावर अवलंबून होते.
मी
दिलेली देवाची व्याख्या अशी होती, “ एक सर्वशक्तिमान नैसर्गिक पवित्र व्यक्ती जी
जगामध्ये चालणाऱ्या सर्व जीवनचक्रांचा सांभाळ करते ”. आणि माझा देवावर विश्वास असल्याचे
कारण मी दुसऱ्या लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे आहे. ते लेख म्हणजे “Do we really believe in god ?”
आणि “Almighty god”. जगात असलेल्या प्रत्येक
सजीव आणि निर्जीव गोष्टीत असलेले सौंदर्य , नाविन्य आणि विभिन्नता मला एका
निर्मात्याची चाहूल देते. निसर्गात असलेल्या अगदी सूक्ष्म जीवापासुन सर्वोच्च
बुद्धिमान प्राणी माणसापर्यंत , लहान रोपट्यापासून मोठमोठ्या झाडांपर्यंत आणि इतर
सगळ्या प्राण्यांमध्ये हुडकून सुद्धा साम्य सापडत नाही. पण हजारो वर्षांपासून हि
विभिन्नता , नाविन्य आणि सौंदर्य निसर्गाकडून राखली कशी जाते ?? आणि तेच तर उत्तर
आहे. याच निसर्गाच्या प्रत्येक जिवन चक्राला तयार करण्यासाठी , राखण्यासाठी आणि
आखण्यासाठी एका महानायकाची गरज असते ज्याला आपण “देव” म्हणतो.
तो
माझ्या उत्तरांप्रती शांतच होता.त्याने पुढचा प्रश्न विचारला, “देवाला देवपण का
येता ?” (अर्थात देव कोणाला म्हणायचं ? तो देव कसा होतो.) त्याला मी दिलेलं उत्तर
परत माझ्याच विचाराचा एक भाग होता आणि मला माहित असलेल्या गोष्टींमधून आला होता. कदाचित हे उत्तर
चूक पण असू शकत. “हजारो वर्ष्यांच्या साधनेतून स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवून मोक्षाला
जाणाऱ्याला देवपण मिळते.”
माझ्या
कुठल्याही उत्तरला सहमत न होता तो वेगवेगळी शंकास्पद प्रश्ने विचारू लागला. त्यापैकी
काही असे होते. “ हिंदू देवांपैकी कोणता देव सर्वश्रेष्ठ आणि सर्वकर्ता आहे ? देव
असून सुद्धा हिंदू देवांमध्ये युद्ध झाल्या असल्याच्या कथा का आहेत ? हिंदू
देवांनमधले काही देव योद्धे होते , तर रणांगणात युद्ध करणारे देव कसे असू शकतात.?
हिंदूंच्या कोणत्या देवाने देवत्वाच्या व्याख्येप्रमाणे आदर्श राहून सामान्य
माणसांची मदत केली आहे.? हिंदू धर्मामध्ये इतक्या देवांची काय गरज आहे जेंव्हा
ख्रिश्चन धर्मात एकच अमर देव आहे.? हिंदू धर्मामध्ये इतके साहित्य आहे , गीता,
पुराने, वेद , मग यापैकी किती साहित्य लोक वाचतात ? आणि इतर काही प्रश्न त्याने
विचारले...
या
प्रश्नांनंतर लगेच त्याने याच प्रश्नांची उत्तरे ख्रिश्चन धर्माच्या समर्थनात
दिली.त्याने येशु च्या जन्मापासून संपापर्यंतच्या गोष्टी सांगितल्या. येशु ने
जगाची उत्पत्ती कशी केली आणि शेवटी जगाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःचा शेवट कसा
केला हे सांगतिले. एका आदर्श देवाच्या व्याख्येप्रमाणे येशु नि जगलेल्या देवरूपी
जीवनाचे वर्णन त्यांनी केले. तो सांगत गेला. हिंदूत्वाच्या शिकवणींना आणि
कल्पनांना चुकीचे ठरवत तो ख्रिश्चन धर्माच्या पूर्णत्वाचे नमुने आणि उदाहरणे देऊ
लागला.
ख्रिश्चन
धर्माच्या त्यांनी केलेल्या वर्णनामध्ये मला बऱ्याच जागी हिंदुनी केलेल्या वर्णनात
साम्य वाटले. देवाचे मानवी अवतार , जगाचा अंत , अमर्याद दैवी शक्ती , स्वर्ग आणि नर्काच्या
कल्पना , अश्या बऱ्याच गोष्टींमध्ये मला दोन धर्मात साम्य आढळले. दोन धर्मात
असलेल्या साम्यतेचा मी बारकाईने कानोसा घेत होतो आणि याउलट ख्रिश्चन धर्मच कसा खरा
आहे हे सांगण्यात तो गुंतला होता. पौराणिक साहित्य , ग्रंथ , देव असल्याचे पुरावे
, धर्मांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी अश्या बऱ्याच गोष्टींवर आमची चर्चा झाली.
माझ्या धर्मिक दृष्टीकोनात भर घालण्यासाठी या संभाषणाची मला मदत झाली.
विषय
जास्तच धार्मिक होत असलेले पाहून मी त्याला वास्तवतेकडे वळवले. त्याच्या
म्हणण्यानुसार जगाची उत्पत्ती येशु नि केली आहे. पण नव्या काळाच्या विज्ञान
क्षेत्रात शिकलेले आपण एक साधा विचार करू शकतो कि खरच पृथ्वीच्या उत्पत्तीसाठी
कोण्या एका माणसाची किंवा देवाची गरज होती का ? त्यांनी सांगितल्याप्रमाणे परत
एकदा येशु पृथ्वीवर येतील आणि तो दिवस शेवटचा असेल जेंव्हा प्रत्येकाच्या
कर्माप्रमाणे त्याला पुढची वर्तणूक दिली जाईल. जगातल्या बऱ्याच शास्त्रज्ञांनी
माणसाची उत्पत्ती कशी झाली आहे हे सविस्तर रित्या सांगितले आहे. त्यांनी येशु
प्रमाणेच जगाच्या शेवटाचे भाकीत सुद्धा केले आहे. मग ते सगळे देव नाहीत का ? हि एक
मोठी गोष्ट आहे. आजच्या या आधुनिक जगात सर्वांना माहित आहे के जगाची उतपत्ती कशी
झाली.मग प्रश्न असा आहे की या उत्पत्तीसाठी हिंदू किंवा ख्रिश्चन धर्माच्या
देवांची गरज कुठे पडली ?
हा
फक्त माझ्या आणि त्याच्यामधला विषय नसून जगातला सगळ्यात जास्त बोलल्या आणि
संभाशील्या जाणाऱ्या विषयांपैकी एक आहे. वसुधैव कुटुंबकं प्रमाणे
आपण जगाला जर एकच कुटुंब समजले तर काय होईल. ? आपण उदाहरण घेऊ चार मोठ्या धर्मांच. हिंदू , बौद्ध , ख्रिश्चन आणि मुस्लीम . या
चारहि खूप भिन्न संस्कृती आणि शिकवणी आहेत. पण या शिकवणीत असलेली भिन्नता फक्त
काल्पनिक गोष्टीं मधून तयार झाली आहे का ? या शिकवणी नक्कीच आपल्याला आपल्यात
असलेल्या भिन्नतेवरून भांडण्यास सांगत नाहीत . नाही नक्कीच नाही !! पण याउलट या
वेगवेगळ्या संस्कृती , शिकवणी आणि पद्धती आपल्याला एकाच देवाकडे जाण्याचे वेगवेगळे
रस्ते दाखवतात.या सर्व शिकवणी एकाच राखणकर्त्याकडे बोट दाखवतात.फक्त त्यांच्या
भाषा वेगळ्या आहेत. आज आपल्याला माहित असलेल्या सगळ्या संस्कृती आणि शिकवणी एकत्र
करून त्यातल्या सोप्या पद्धितीचा वापर केल्याने नक्कीच कुणाचे नुकसान होणार नाही. लहान
पणापासून आपण ऐकत असलेल्या चांगल्या गोष्टी सोप्या पद्धतीने मिळवण्यासाठी
एकमेकांमधील वेगळेपण शोधणे थांबवुन सारखे पण्याच्या चर्चा केल्या पाहिजेत. ....
"हिंदू" कि "ख्रिश्चन" ? पृथ्वीच्या उत्पत्तीचे श्रेय कोणाला ??
Reviewed by Akshay
on
9:59 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....