मी मध्य रातीचा चंद्र..
तू सांज रातीची चांदणी ..
मी मंद प्रकाश पौर्णिमेचा .
तू रात्र मधुमिलनाची..
मी दीर्घ श्वास
विश्वासाचा..
तू झुळूक हळुवार मायेची..
मी सागर अथांग प्रेमाचा
तू कमळ छबी प्रीतीची..
मी दाटून आल्या नाभासारखा..
तू जमीन आतुरलेली..
मी पाउस पहिला ऋतूचा
तू जमीन मी बिलगलेली..
मी शब्द तुझ्या पासचे.
तू कवित्या त्या शब्दांची.
मी भाव कवितेचा..
तू चाल त्या कवितेची..
मी आंगण घरापुढचे..
तू तुळस संस्काराची..
मी उंबरठा परिश्रमाचा.
तू सीमा मर्यादेची..
मी शुभ्र गोरा चेहरा
तू हास्य छटा त्यावर
सुंदर..
मी नयन तुझे बोलके.
तू शृंगार अति सुंदर..
मी सूर जीवनगीताचा..
तू वाणी अति मंजुळ..
मी कल्पवृक्ष प्रेमाचा
तू मृगजळ अति चंचल..
मी कृष्ण असा खट्याळ
तू राधा असे बावरी..
मी मुरलीधर बेधुंद
वेणू तू सुरेल...
मी आणि तू...
Reviewed by Akshay
on
12:10 PM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....