आली दिवाळी 2013 !





नमस्कार !!
दिवाळी आली असे ऐकल्यावरच प्रत्येकाच्या मनात दिवाळीच्या त्यांनी तयार केलेल्या कल्पनेचे चित्र सामोर येते.कुणासमोर फराळाच्या वेगवेगळ्या प्रकराणी भरलेले ताट तर कुणासमोर मामाचे गावं .कुणासमोर पाहुण्यांनी गजबजलेले घरचे वातावरण तर कुणासमोर मित्रपरिवारांना भेटण्याचा एक बहाणा.कुनासामोरे सजवलेले घर आणि घरासमोर लावलेला आकाश दिवा.कुणासमोर नवीन कपडे आणि नवीन वस्तूंची खरेदी.कुणासमोर लक्ष्मी पूजन आणि कुणासमोर भाऊबीज.कुणासमोर उटण्याची अंघोळ आणि उकडीचे दिवे तर कुणासमोर रात्री घरासामोर लावलेली दिव्यांची माळ.
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
पण या सगळ्या दिवाळीच्या विचारात आपण मग्न असताना मध्येच फटाक्यांच्या आवाजांचा अडथळा आपल्याला जाणवत नाही का ? फटाक्यामुळे होण्याऱ्या प्रदूषणाचा प्रभाव जाणवत नाही का ? फटक्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत बऱ्याच जणांना होणाऱ्या शारीरिक हानीचा प्रभाव जाणवण नाही का ? हो नक्कीच जाणवतो पण आपण नेहमीप्रमाणे परत त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.
       दिवाळी या सगळ्यात मोठ्या सणाचा अर्थ आपण हळू हळू बदलत आहोत....दिव्यांची दिवाळी आता फटाक्यांची दिवाळी होत आहे..त्यापासून होणारे ध्वनी प्रदूषण , उंच उंच जाऊन फुटणाऱ्या फटाक्यापासून जमिनीवर धुराडी करणाऱ्या फटाक्यापर्यंत सगळ्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण याच्याकडे आपण जाणून बुजून दुर्लक्ष करत आहोत. त्यांचे परिणाम जरी प्रत्यक्षपणे कमी प्रमाणात आपल्याला दिसत असतील तरी ते शांत पणे पसरत असतात. प्रदूषणाची आकडेवारी आधीच आपल्याला वाचता येणाऱ्या अंकापुढे गेलीय. त्यात भर म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने होईल तितकी मोठी आवाज करणारी फटाके वाजवणे हि गोष्ट माझ्यातरी मनाला पटणारी नाहीये.
       फटाके न उडवणे म्हणजे आपण दिवाळी सणाचा अर्थ बदलत आहोत असे आजीबात नाही याउलट नवीन नवीन प्रकाचे घातक फटाके उडवून आपण दिवाळी सणाच्या साजरीकरनाला भयानक रूप देत आहोत. लहानांच्या अट्टाहासासाठी कमी प्रदूषण करणारे आणि कमी घातक असणारे फटाके वापरणे वेगळे आणि भयानक आवाज आणि धूर करणारे फटाके वापरणे यात खूप फरक आहे. असे घातक फटाके न वापरता आपण आपल्या मुलांना किंवा परीवारीतील इतर व्यक्तींना दिवाळी सणाच्या पावित्र्याचे किंवा त्याच्या खऱ्या अर्थाचे महत्व पटवू शकतो.
       दिवाळी साजरी करण्याचे इतके प्रकार असताना घातक फटाके वापरूनच दिवाळी पूर्ण झाली पाहिजे असा आग्रह म्हणजे क्षणिक आनंद साठी दीर्घकाळ आनंदाचा बळी देणे होय. फटाक्यांचा आनंद जर इतका क्षणिक असेल तर त्याच्या ऐवजी दिवाळी निमित्त केल्या जाणाऱ्या इतर गोष्टींचे महत्व आपण आपल्या मुलांना किना इतर मित्र परिवाराला सांगू शकतो. तेच पैसे आपण एका गरीब घरातल्या लहान लेकरांना साधेच पण नवीन कपडे किंवा मिठाई देऊन खर्च केले तर ते जास्त कामी लागतील असे म्हणता येईल. त्या गरीब लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद हा फाटाक्यापासून मिळणाऱ्या आनंदासमोर नक्कीच नगण्य आहे.
मागच्या वर्षी मला Eco friendly दीपावली ला खूप मस्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी सुद्धा अशाच प्रतिसादाची मी माझ्या जागरूक मित्रपारीवारांकडून अपेक्षा करतो. चला तर मग “धन त्रयोदशी , नरक चतुर्दशी , लक्षी पूजन , बली प्रतिपदा आणि भाहुबीज” यांना मिळून बनलेल्या आनंदमय सणाचा आनंद “प्रदूषण रहित दिवाळी” या नावाने साजरी करू
सण एकच पण त्याचे रंग वेगवेगळे.या विविधता पूर्ण सणाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी.
आली दिवाळी 2013 ! आली दिवाळी 2013 ! Reviewed by Akshay on 3:19 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.