मी सांगत नाही कधी तुला, पण तुझी आठवण येते ग..
प्रत्येक क्षण जणू, तुझीच हाक देते ग.
आजही हा दुरावा, मला तसाच छळतो ग.
आठवणीत कालच्या, मी आजही जळतो ग.
मना मनाचा बोलका अबोला, मलाही कळतो ग..
मुक्त होऊन तुला भेटण्या, जीव तळमळतो ग..
कळूनही सारे कोण जाने, देव माझा न वळतो ग..
सर्व जाणता देव तरी पण, कसा खेळ खेळतो ग..
मी सांगत नाही कधी....
Reviewed by Akshay
on
2:44 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....