आठवतं का तुला ?



आठवतो का तुला तो दिवस..
जेंव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं..
पहिल्याच भेटीत आपल्या ,
मी तुला माझं समजलं होतं..
       आठवतं का तुला ते कारण,
       जे मी दुसऱ्या भेटीसाठी केलं होतं,
       प्रश्न किती सोपा होता माझा,
त्याचं उत्तर तू किती अवघड दिलं होतं.
आठवते का तुला ती जागा,
जिथे मी तुला तिसऱ्यांदा रोकलं होतं..
मनातलं काही बोलून दाखवायला,
शब्दात जीवाला एकवटलं होतं
       आठवतो का तुला तो क्षण,
       जेंव्हा तू मला डोळ्यांनीच उत्तर दिलं होतं.
       ओल्या पापण्यांच्या साक्षीने,
       सगळं काही सांगितलं होतं..
आठवतात का तुला ती तास,
जे आपण असेच मागे टाकायचो..
हातात हात धरून,
एकटक पाहायचो..
       आठवतात का तुला ते रस्ते,
       ज्यावर आपण बिनधास्त फिरायचो
       हाताहाताचा स्पर्श होताच..
       अंगावर शहारे आणायचो..
आठवतात का तुला त्या गप्पा,
ज्या आपण फक्त सुरु करायचो..
आजूबाजूच्या दुनियेवर,
दोघं मिळून हसायचो...
       आठवतात का तुला ती स्वप्न..
       जी आपण दोघं मिळून रंगवायचो..
       स्वप्नाच्या दुनियेत,
       तासंतास फेऱ्या मारायचो...
 
आठवतं का तुला ? आठवतं का तुला ? Reviewed by Akshay on 2:50 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.