स्वप्नातल्या घरी माझ्या ,
अन्नपूर्णेचा निवास आहे.
ताटातला प्रत्येक घास, अमृताचा घास
आहे.
मायेचा पदर आहे , बापाचा आधार आहे.
आजीच्या गोष्टी आहेत , आजोबांचा
धाक आहे.
स्वप्नातल्या घरी माझ्या ,
भावंडांच्या गप्पा आहेत
इवलुश्या लेकरांचा गोंगाट आहे..
स्वप्नातल्या घरि माझ्या ,
वाद्यांचा नाद आहे.
बोली भाषेत आमच्या स्वरांमधली
कोमलता आहे.
स्वप्नातली घरी माझ्या चंदनाचा
सुवास आहे.
तुळशीसमोर लावलेला अखंड दीप आहे...
घर आहे छोटेसे पण मन मात्र मोठी
आहेत.
स्वप्नातल्या घरी माझ्या...
Reviewed by Akshay
on
8:53 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....