Home Quarantine, Corona, Goverment and India


Coronavirus in Maharashtra

केंद्र सरकार आणि सर्व राज्यांचे राज्य सरकार मिळुन कोरोना च्या विरोधातल्या युद्धात जी तत्परता दाखवत आहेत ते खरेच कौतुकास्पद आहे.
गेले 30 दिवस मी Home Quarantine होतो. या दरम्यान प्रशासन काय काय करत आहे याचे एक उत्तम उदाहरण मला घरी बसुन बघायला मिळाले.
1. मला या दरम्यान दररोज सरकारी दवाखान्यातुन किमान एक तरी चौकशीचा कॉल येत होता.
2. रोज माझ्या तब्येतीची चौकशी तर होतच होती पण ती त्यांच्या सिस्टम मध्ये रेकॉर्ड पण होत होती. म्हणजे मी आज माझे डोके दुखत आहे असे सांगितले तर उद्याच्या कॉल मध्ये मला विचारले जात की आज डोके दुखतंय का? लक्षात घ्या, माझ्यासारख्या कित्तेक home quarantine लोकांशी ते असा followup दररोज घेत होते आणि त्यांचा रेकॉर्ड पण ठेवत होते.
3. या दरम्यान मला पोलीस ठाण्यातून देखील बरेच कॉल आले. मी कुठे फिरतोय का, माझे कुटुंब कुठे आहे, ते कसे आहेत, कधी पासुन दुर आहेत असे प्रश्न मला विचारले जात. त्यांनी देखील वेगवेगळे सुरक्षित राहण्याचे मला सल्ले दिले.
4. माझ्या घरापर्यंत येऊन 2 वेळा सरकारी दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या तब्यतीची चौकशी केली. त्यांच्या तुकडी सोबत पोलीस कांस्टेबल पण असायचे. म्हणजे, आरोग्य खाते आणि पोलीस दोघेही मिळुन काम करत होते. घरोघर जात होते.
5. माझ्या नावाने, सरकारी दवाखान्यातून आणि पोलीस निरीक्षकांकडून दोन तीन माहिती पत्रके सुद्धा आली. मी काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, माझा quarantine कालावधी कुठून कुठपर्यंत आहे इत्यादी माहिती त्यात आहे.
6. दोन वेगवेगळ्या वेळी सफाई कर्मचारी मी राहतो त्या ठिकाणी येऊन गेले. पाहिल्या वेळी माझ्या Floor चे sanitization झाले आणि दुसर्या वेळी माझ्या अपार्टमेंटचे. या इतर माझ्या सोसायटी मधल्या बर्याच जणांनी स्वतःहून पुढे येऊन वारंवार माझ्या ताब्यातीची चौकशी केली. तसेच प्रत्येक वेळी मला घरी सामान आणून देणे असो किंवा माझ्याशी कॉल करुन माझे मनोबल वाढवणे असो, अशा पद्धतीने मदतही केली...

आपल्यातल्या बर्याच लोकांना अजुन या परिस्थिती सोबत कसे वागायला पाहिजे याची समज येत नाहिये. शासनाच्या इतक्या प्रयत्नांना तेंव्हाच यश येऊ शकेल जेंव्हा आपण त्यांना सहकार्य करू.. ही त्यांची एकट्याची लढाई नाहिये.. ही सर्वांची लढाई आहे.

अजुन एक महत्त्वाचे...
असा युद्ध पातळीचा प्रसंग आपण सगळेच अगदी पहिल्यांदाच पहात आहोत. कदाचित पुढच्या अशा प्रसंगावेळी आपल्याला जास्त अवघड जाणार नाही. तर या पाहिल्या वेळी आपल्याला बर्याच गोष्टींवर खुप बारीक लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
1. आपल्याला प्रशासनाच्या कष्टांवर चुकीच्या कमेंट्स करून त्यांचे मनोबल कमी करायचे नाहिये.
2. आपल्याला आपल्या घरी कामाला येणार्या किंवा ओळखीच्या, हातावर पोट असलेल्या लोकांना दुर करायचे नाहिये. ते जरी कामाला येऊ शकत नसतील तरी पूर्ण पगार नाही तर किमान अर्धा तरी पगार त्यांना विना काम द्यायचे आहे.
3. चुकीच्या बातम्या, लिंक्स किंवा बिन अर्थी जोक्स पुढे फॉरवर्ड करने आपल्याला थांबवायचे आहे. हीच वेळ आहे जेंव्हा आपण आपल्या चुकीच्या सवयी मोडून काढू शकतो.
4. सोशल मीडिया awareness खुप महत्त्वाचे आहे. आपल्या एका मैसेज मुळे एक चुकीची माहिती पुढे जाते याचे भान आपण ठेवले पाहीजे. कुठलाच मैसेज verify न करता पुढे न पाठवणे ही चांगली सवय आपण डेवलप केली पाहिजे..
5. घरी बसुन आपल्याला आपल्या घरातील सदस्यांना त्रास द्यायचा नाहिये. आई वडील किंवा पत्नी यांच्यावर कुठल्याच प्रकारची सक्ती करायची नाहिये.
6. प्रत्येकाला आपला पर्सनल स्पेस हवा असतो. तो मिळत नाही म्हणुन कित्येकदा कपल्स मध्ये भांडणे होत असतात. आपल्याला घरात रहायचे आहेच पण घरात राहुन एकमेकांच्या पर्सनल स्पेसची सुद्धा काळजी घ्यायची आहे.

आपण एक जबाबदार नागरिक आहोत असे वारंवार स्वतःला सांगितले पाहिजे. एक दिवस आपोआप आपण जबाबदार होतो आणि आपल्याला कळणार पण नाही..हा ब्रेन ट्रेनिंग चा एक महत्त्वाचा भाग आहे.

घरी राहाल तर "राहाल"...
जिएंगे तो और भी लढेंगे
Home Quarantine, Corona, Goverment and India Home Quarantine, Corona, Goverment and India Reviewed by Akshay on 11:38 PM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.