पुरुष




पुरुष नावानेच बदनाम झाले आहेत , पण लाखो पुरुष ज्यांना त्यांच्या बायकोकडून त्रास होतो त्यांचा आवाज कुठेच नसतो . मग काय , पुरुष आत्महत्त्या करतो , दारू पितो , सिगारेटी फुंकतो, स्वतःची काळजी घेत नाही आणि वयाच्या खूप आधी हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक ने मरतो . त्यांनतर काय होतं ? ज्या बाईने आणि तिच्या घरच्यांनी त्याला जिवंत पणी एक क्षण सुद्धा जगू दिले तेच लोक त्याची आयुष्यभराची कमाई त्याच्या मरणांत हडप करतात . किती पुरुश्यांना न्याय मिळतो ? न्याय सोडा , पुरुष का मेला हे किती वेळा समजत ? 

 कोणता पुरुष रडत दुसरीकडे जातो आणि सांगतो मला माझी बायको त्रास देते ? मारते ? शारीरिक मानसिक छळ करते ? तो सांगूच शकत नाही . समाजाने पुरुषाला जबाबदार , कर्तृत्ववान , कष्टाळू , कमवीता , बाप , मोठा , मालक अश्या पदव्या देऊन त्याच स्वातंत्र्य ओढून घेतलेलं असतं .लहापानापासूनच त्याला तुझं तू बघ . आणि दुसऱ्यांचही तुलाच बघायचंय , तुलाच कामवायचंय , लेकरांची बायकोची जबाबदारी घ्यायचीय या गोष्टी त्याच्या अंतर मनावर बिंबवल्या जातात . कोणी ते मुद्दाम करत नाही पण हे जग असच चालतं . तरुणपणी असा घडलेला मुलगा , मोठा होऊन लग्न करतो आणि घर , गाडी , पैसा , बायको लेकरं या दुनियादारी मध्ये अडकतो . त्याला विश्रांतीच नसते . त्याच ऑफिस ला जाणं घरी बसलेल्या बायकोला त्याचं स्वतंत्र आहे असं वाटतं . भयाण ट्राफिक मधून , गर्दीतून ऑफिस ला जाऊन तो तिथे त्याच्यावर लादलेल्या जबाबदारीला समोर ठेवून लाचार होऊन काम करतो . त्याला लोन चे हफ्ते दिसत असतात , त्याला मुलांच्या शाळेच्या फीस दिसतात , त्याला घर चालवण्यासाठी लागणारा खर्च दिसत असतो , घरातल्या कामाच्या बायका , गाडीसाठी पेट्रोल , रिचार्जेस , subscriptions सगळ्या गोष्टी डोक्यात घुमत असतात . लाचार होऊन, कातडी वाचवून काम करतो , आणि घरी येतो . घरच्या बाईला तो किती मजा करून आला असेल हेच दिसतं . मी दिवसभर लेकरांसोबत होते आणि हा बाहेर फिरत होता हे तिच्या डोक्यात असतं .मग नवरा दिसतातच , त्याला कसे चावू , कसा सगळा राग त्याच्यावर काढु , कसा त्याला दाखवू कि घरात राहून मी किती उपकार केले हे तिच्या डोक्यात असतं . मग काय, भांडण , चिढचीड , आणि नको त्या सगळ्या गोष्टींना त्याला सामोरं जावं लागत .

आता या दुनियादारीत अडकलेल्या माणसाला कुणी शिकवलेलंच नसतं कि तुला त्रास झाला तर तू काय करावं . किंवा समाजाने त्याला व्यक्त होण्यासाठी जागा दिलेलीच नसते. याउलट एखाद्या बाईला नुसता काटा टोचला तर डोक्यावर उचलून घेतील तिला लोक . ती नवऱ्याला भांडणार , तिच्या घरी बोलणार , त्याच्या घरी बोलणार , शेजाऱ्यांना , मित्रांना , मैत्रिणींना बोलणार आणि स्वतःला मी किती "दुःखात" आहे हे सिद्ध करणार . एक माणूस हे करूच शकत नाही. तो स्वतःसोबत , बायकोसोबत आणि समाजा सोबत लढत असतो . एकटा . एकटाच त्रासात असतो. हे सगळ्यांसोबतच होतं असं मी म्हणत नाही पण असे बरेच आहेत आणि त्यांची कोणीच दाखल घेत नाही. बेंगलोर च्या ३४ वर्षाच्या अतुल सुभाष च काय झालं ? त्याच्या बायकोने , तिच्या घरच्याने , कोर्ट ने त्याला कित्तेक वर्षे त्रास दिला . त्रासाला कंटाळून १ तासाचा विडिओ आणि कित्तेक पानाचे पत्र लिहून त्याने स्वतःला संपवले.

"मला न्याय मिळाल्या शिवाय माझे अंत्य विधी करू नका" असे दोन वर्षा खाली सांगून त्याने आत्महत्या केली पण त्याला अजून न्याय भेटला नाही . त्याने त्रासाला कंटाळून स्वतःचा जीव दिला हो ..जीव दिला ..यापेक्षा अजून कोण काय पुरावा देऊ शकेल ? पण या समाजाने ते मान्य केले नाही . हा कायदा मुलींसाठी आहे . एका माणसाला या व्यवस्थेकडून न्याय मिळेल हे होऊच शकत नाही . जिवंत पणिच काय अगदी मेल्यावर देखील त्याला न्याय भेटू शकत नाही हे अतुल सुभाष ने सिद्ध करून दाखवले.
पुरुष पुरुष Reviewed by Akshay on 9:13 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.