हल्ली मी इथे रोज येतो !


कॉलेज मध्ये असताना फिरणे हा रोजचच विरंगुळा होता आणि तो बऱ्याच जणांचा असतो .
रात्रीच्या जेवणानंतर फिरणे हा जणू सवईचा भाग झाला होता.
त्यातच कॉलेजच्या शेवटच्या semester मध्ये मी एकटाच एका कट्टयावर बसायचो.
त्या कट्ट्यावरून कॉलेज सहज लख्ख आणि शानदार दिसायचे.
त्याच कट्टयावर बसून लिहिलेली हि कविता...

हल्ली मी इथे रोज येतो
वाऱ्याचा गारवा रोजच प्रतिसाद देतो

हल्ली मी इथे रोज येतो ,
न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधतो..
प्रश्न उत्तरांचा खेळ बराच वेळ चालतो ..
हल्ली मी इथे रोज येतो...

काय केलं आणि काय करू शकलो असतो याचा गोंधळ सुरु असतो
गोंधळातच हसून दुसरीकडे पाहतो 
हल्ली मी इथे रोज येतो...

माझ्यातली ती आणि तिच्यातला मी शोधण्याचा प्रयत्न करतो
हल्ली मी इथे रोज येतो...

चुकलेले नि न चुकलेल्यांचा बेत लावतो
आणि हल्ली मी इथे रोजच येतो...

मी कोणाचा आणि माझे कोण याचा विचार करतो ..
आणि सतत आठवणाऱ्या तिच्या आठवणींना अवर घालतो
आणि हल्ली मी इथे रोजच येतो...

कधी NEWTON कधी EINSTEINवर हसत ENGINEERING चा अर्थ लावतो
आणि हल्ली मी इथे रोजच येतो...

CANTEEN च्या बिलाचा विचार करत उधारीच्या सिनेमाचे पैसे वेगळे काढतो
आणि हल्ली मी इथे रोजच येतो...

गर्दीत न समजणाऱ्या इशाऱ्यांचा एकांतात अर्थ लावतो
आणि हल्ली मी इथे रोजच येतो...
हल्ली मी इथे रोज येतो ! हल्ली मी इथे रोज येतो ! Reviewed by Akshay on 10:56 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.