कॉलेजातले दिवस मात्र वेगळेच होते ....

कॉलेज आता फक्त आठवणीतच राहिले
जे वाटायचे आपले ते दुसऱ्यांचे झाले ||

कॉलेजातले दिवस मात्र वेगळेच होते
जणू दिवस आणि रात्रीत अंतरच नव्हते ||

वर्ग भरलेले कारकुनांनी
पण एन्गिनीअर्स मात्र बाहेरच होते ||

कॉलेजातले दिवस वेगळेच होते ,
कधी कट्टा कधी कॅन्टीन ,
जागा बदलेली पण काम मात्र एकच होते ||

वायफळ गप्पांना वेळ नाही पुरायचा
आणि अभ्यासाला मात्र वेळच नसायचा ||

शेल्फ मधली पुस्तके नुसती शोभेपुरतीच असायची
त्यांची बारी तर आदल्या रात्री असायची ||

फेसबुक , मोबाईलच्या या प्रवासाचा कधी कंटाळाच आला नाही
झोपून काढलेल्या तासांचा आता गंधही उरला नाही ||

उधारीच्या चहा नाश्त्याला गप्पांचीच असायची चव
चहा आहे आता महागाचा , पण गप्पांची नाही चव !!

मित्राच्या गाडीत पेट्रोल टाकून रस्ते करायचो जवळ
गाडी , पेट्रोल आहे आता पण ते रस्तेच नाहीत जवळ !!

मित्रांसोबतच्या त्या प्रवासात दिवसांमागून दिवस गेले आणि गेले वर्ष्यांमागून वर्ष
ऑफिसातल्या एकेका क्षणाचा जणू आता होतोय एक वर्ष.......|||

कॉलेजातले दिवस मात्र वेगळेच होते .... कॉलेजातले दिवस मात्र वेगळेच होते .... Reviewed by Akshay on 10:59 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.