एकटा असताना मनात घुटमळनारी ती कविता ...
शब्दांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेली ती कविता
कधी अबोल भावनांना साथ देताना
कधी असवलेले डोळे पुसताना
कधी हास्य खेळ खेळताना
ती कविता
कधी आईची स्तुती करताना
कधी बापाचे कष्ट सांगताना
ती कविता
क्षणभरात हसवणारी
शांत आसवे कोसळावणारी
अगदी सहज रोमांच उभारणारी
ती कविता
विरह गीत गाणारी
मिलनात धुंद झालेली
प्रेम रंग खेळणारी
ती कविता
सखी तुझ्या आठवणीत मनात घोळणारी
क्षणात कागदावर प्रकटणारी
आठवणीचा दिवा तेवत ठेवणारी
ती कविता
प्रसंगी ढाल बनणारी
तीव्र वार करणारी
घाव मागे टाकणारी
ती कविता
रस्ते , खिडक्या ,झाडे ...किनाऱ्यावर
तुझी साथ मागणारी
ती कविता
मोडक्या तुटक शब्दात प्रकटणारी
कधीपूर्ण कधी अर्धीच राहाणारी
निरपेक्ष,स्वच्छंद भावना म्हणजे
ती कविता
शब्दांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेली ती कविता
कधी अबोल भावनांना साथ देताना
कधी असवलेले डोळे पुसताना
कधी हास्य खेळ खेळताना
ती कविता
कधी आईची स्तुती करताना
कधी बापाचे कष्ट सांगताना
ती कविता
क्षणभरात हसवणारी
शांत आसवे कोसळावणारी
अगदी सहज रोमांच उभारणारी
ती कविता
विरह गीत गाणारी
मिलनात धुंद झालेली
प्रेम रंग खेळणारी
ती कविता
सखी तुझ्या आठवणीत मनात घोळणारी
क्षणात कागदावर प्रकटणारी
आठवणीचा दिवा तेवत ठेवणारी
ती कविता
प्रसंगी ढाल बनणारी
तीव्र वार करणारी
घाव मागे टाकणारी
ती कविता
रस्ते , खिडक्या ,झाडे ...किनाऱ्यावर
तुझी साथ मागणारी
ती कविता
मोडक्या तुटक शब्दात प्रकटणारी
कधीपूर्ण कधी अर्धीच राहाणारी
निरपेक्ष,स्वच्छंद भावना म्हणजे
ती कविता
कविता !
Reviewed by Akshay
on
10:57 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....