लोणावळा - महाराष्ट्र



लोणावळा – पुण्यापासून ६६ K.M वर असलेले पर्यटन स्थळ..


वळणावळणाचे रस्ते , हिरवीगार झाडे , जागोजागी साठलेले पाणी , डोंगरातून निघणारे छोटे छोटे झरे , एखाद्या मोठ्या झऱ्याखाली भिजणारी मुलांची किंवा मुलींची “टोळी” , डोंगरावर अंगाला स्पर्श करून जाणारे ढग , सगळीकडे पसरलेले धुके आणि प्रसिध्द लोणावळ्याची चिक्की या सगळ्यांचे मिळून बनलेले ठिकाण......असे लोणावळ्याचे संक्षिप्त वर्णन करता येईल...


       “ पावसाळा आणि लोणावळा ” सारखे शब्द तर आहेतच पण त्यांच नातं पण तसच आहे. लोणावळ्याला पावसाळ्यात इतर ऋतू पेक्षा जास्त गर्दी असते ती म्हणजे इथल्या अतिशय रम्य निसर्ग सौंदर्यामुळे. पुणेच नाही तर दूरदूर वरून लोक हमखास पावसाळ्यात लोणावळ्याला भेट देतात.या गर्दी मध्ये प्रेमी युगुल , मुले नि मुलांचे ग्रुप यांची संख्या इतर संख्येपेक्षा जास्त असते...


       २०११ मध्ये third year engineering नंतर in-plant training साठी पहिल्यांदाच पुण्यात आल्यावर लोणावळ्याला भेटणे म्हणजे माझ्यासाठी पुण्याच्या वातावरणाची ओळख पटवून घेणे ठरले..


       पुण्यापासून local train ने थेट लोणावळ्याला जाता येते किंवा two-whiller वर अडीच ते तीन तासात पोहोचता येते. मित्रांसोबत पुणे आणि परिसर गाडीवर फिरन्यासारखा दुसरा अनुभव असणार नाही असे म्हणता येईल...

 

 











लोणावळा - महाराष्ट्र लोणावळा - महाराष्ट्र Reviewed by Akshay on 12:13 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.