पुणे म्हटले कि त्याच्या अवतीभोवती असलेले गढ आलेच...!!
पुण्यापासून ५०-६० km वर सिंहगड असेल पण high speed ने जाणाऱ्या bikes वरून जाताना ते अंतर नक्कीच थोडेसे वाटते..
सिंहगडाची उंची बघून पूर्वीच्या काळात मावळ्यांच्या आणि राजाच्या अंगी असलेल्या बाळाची कल्पना येणे अगदी साहजिक आहे. उंचीवर असलेल्या गडावर जाण्यासाठी बांधलेला एकच अरुंद रस्ता आहे. कार किंवा दुचाकी सहज पायथ्यापासून गडापर्यंत चालवत नेता येते.
सगळीकडे पसरलेले दाट धुके , गडावरून अगदी लहान दिसणारे पायथ्याला वसलेले छोटे गावं , महाराजांच्या नावाचा जयघोष करणारे मुलं , सिंहगडावर भेटणारे “दही – भाकरी – पिटलं” , गरम कांदा भजे आणि थंडी मध्ये चविष्ट लागणारा गरम चहा , भाजलेले कणीस आणि त्यावर लावलेले तूप – मीठ....असे गडाचे वर्णन करता येईल...
अगदी उंचावरून दूरपर्यंत पसरलेल्या हिरवळीकडे पाहण्याची मज्जा वेगळीच आहे...त्यातच सिंहगडावर हळुवार पाऊस म्हणजे स्वर्गाला दोन बोटं कमी म्हणता येईल !!
सिंहगड – पुणे , महाराष्ट्र.
Reviewed by Akshay
on
1:31 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....