हो माणूस आहे मि....(भाग २)


प्रश्नच नाही , आपण माणूसच आहोत. माणूस असल्यामुळे आपल्या वाट्याला आलेले सुख आणि दुखः मी दोन वेगवेगळ्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलाय.
एक म्हणजे माणसात असलेल्या बुद्धिमान, वैचारिक, सुंदर, आणि कलाकार असे गुण जे फक्त माणसांमध्येच असतात,त्यांचे वर्णन करणारी कविता. आणि दुसरी म्हणजे माणूस असून सुद्धा भोगाव्या लागणाऱ्या वेदना, कष्ट , सहनशीलपणा, आजार, मृत्यू, भूक, भीती अश्या गुणांचे वर्णन करणारी कविता. या दोन विषयांपैकी पहिल्या विषयावर असणारी हि कविता.
 
हो माणूस आहे मि..
निर्मात्याच्या कल्पेनेची,
सर्वोत्तम निर्मिती आहे मी..

हो माणूस आहे मि..
सौंदर्यपूर्ण रूपातला
चंद्र आहे मी..

हो माणूस आहे मि..
भावनांनी सजवलेला
भाव आहे मी..

हो माणूस आहे मि..
आई रुपी छायेमधली,
माया आहे मी....

हो माणूस आहे मि..
इवलुश्या जिवामधला
बाळ आहे मी ..

हो माणूस आहे मि..
प्रौढ वयातला,
आशीर्वाद आहे मी..

हो माणूस आहे मि..
ज्ञान रुपी म्यानेमधली
तलवार आहे मी..

हो माणूस आहे मि..
बुद्धिरूपी तलवारीची..
धार आहे मी..

चतुर, विवेक, आनंदी, परिपूर्ण आहे मी
हो माणूस आहे मी...

हो माणूस आहे मि....(भाग २) हो माणूस आहे मि....(भाग २) Reviewed by Akshay on 5:04 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.