रविवारच्या सुट्टीत लिहिलेलं एक कल्पक लिखाण...
"वाट पाहीन मी तुझी, call कर
सकाळी" , म्हणून ती झोपायची..
मोठ्ठा आवाज करत वाजणाऱ्या
घड्याळाला आम्हाला कसे उठवायचे हे माहित असावे बहुतेक. घड्याळ वाजल्यानंतर लगेच
आपण उठलो असे वाटत असले तरी अर्धा तास संपलेला असतो. उद्या निवांत अंघोळ करू असे
रोजच जरी ठरवले तरी तो उद्या कधीच येत नाही. त्या अर्ध्यातासाची झोप भरून
काढण्यासाठी मग धावपळ सुरु होते. पळत पळत केस विंचरण्यापासून ते हातात बूट घेऊन
दरवाजा बंद करण्यापर्यंत सगळी शक्ती पणाला लावली जाते. धावत धावत धापा टाकत बसच्या
स्टॉपपर्यंत कसेतरी स्वताला खेचत आणले जाते. आणि तिथून सुरे होतो दिवस..
तिकडे ती उठलेली असायची , लवकर उठून हातात फोन घेऊन वाट पाहत
बसायची..एक दीड तासानंतर तिला समजून जायचे मी आजही विसरून गेलो..कामावर गेल्यावर
तरी कळवेल, एखादा massage तरी करेल असा तिचा विश्वास. वाट पाहताच ती तिची कामं
आवरायची .
काल अर्धवट राहिलेल्या कामाचा अंदाज येताच धावत जागेवर जाऊन
बसणाऱ्या मला, फक्त काम पूर्ण करण्यासाठी मिळालेल्या वेळाचा आकडा लक्षात राहतो.
अजून पर्यंत ‘ति’चा विचार पण आलेला नसतो. फोने वाजतो आणि तिचा massage, “नाश्ता
झाला” ?? “अरे बापरे, विसरलो!!!” म्हणतच पटकन उशीर न करता खूप साऱ्या सकाळच्या
शुभेच्छा आणि दिवसभराच्या शुभेच्छा पाठवल्या जातात. “हो झाला ” याच्या पाठोपाठ “मी
विसरलो , उशिरा उठलो, खूप काम होतं , फोनवर बोलत होतो , मित्र भेटला वाटेत ” अशी
कारणं पण न मागताच पाठवली जातात. “ठीक आहे , रिकामा झाला कि massage कर” म्हणून
माझ्या दया याचिकेला माफी दिली जाते. थोड्यावेळाने लक्षात येत कि तिने नाश्ता केला
का हे विचारायचच राहिलं.
“तुझा नाश्ता झाला” ? असा massage करताच तिचं उत्तर “हो झाला ना,
काय करतोय” ? यायचं . ते न पहाताच मी परत कामामध्ये आणि परत ती उत्तराची वाट पाहत
बसायची. दुपारी जेवणाच्या वेळी बरोबर massage यायचा “जेवण झालं” ? “हो करतोय , आत्ताच आलो , तू काय करतीय” या
माझ्या उत्तरानंतर “काय जेवतोय” ? , “काम खूप आहे का” ? , “वेळ भेटत नाहीये का” ?
असे massage यायचे...सगळ्यांच उत्तर एकाच massage मध्ये देत मी massage पाठवतो
“जागेवर आलोय , नंतर बोलू.”. “ठीक आहे , वापस जाताना call कर” म्हणत ती जेवण करते.
परत मी विसरून जातो “तिचं जेवण झालं का ? ते मी विचारलं का ?”
संध्याकाळी ८ वाजता माझ्या थकलेल्या डोक्याला नि अंगाला खेचत बस
पर्यंत आणले जाते. जागा मिळताच काही वेळात झोप लागलेली असते. गाढ झोप लागणारच
इतक्यात , “उठ रे , तुझा stop आला” म्हणत बाजूचे उठवतात आणि मला बस बाहेर काढतात.
सवयी प्रमाणे खिशातून मोबाईल हातात येतो आणि तिचे ३-४ तरी massage आलेले असतात.
रूम येईपर्यंत तिच्याशी बोलायला वेळ
मिळतो. कपडे बदलण्याच्या आधीच कॉम्पुटर चालू झालेला असतो आणि कामं सुरु
होतात..बोलत बोलत १५-२० मिनिटांनी कामाचे कारण सांगून फोन ठेवला जातो. timepass
मध्येच १० वाजतात आणि १२ वाजता तिचा call येतो.. “अजून झोपला नाहीस ?, जेवण झालं
?, झोप लवकर थकला असशील...”
“आणि हो , मी वाट पाहीन तुझी , सकाळी call कर ” म्हणून ती झोपायची....
.
.
परत धावपळ...परत विसरणं..
तिचा जीव माझ्यात आणि मी कामात !!
Reviewed by Akshay
on
6:40 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....