कधी कधी...



कधी कधी एकटा असताना उगीच एक हाक ऐकू येते . कुणीतरी बोलावतय असं वाटतं . हालणाऱ्या पडद्याआड कुणीतरी आहे आणि माझ्याकडे पहातय असं वाटतं . अर्धवट राहिलेल्या विषयांना पूर्ण करण्याची कुणीतरी जिद्द करतय असं वाटतं . मिटून ठेवलेल्या विचारांच्या वादळातून कुणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करतंय असं जाणवतं ....

तो आवाज त्याचा आहे. हि धडपड त्याचीच आहे. या हालचाली तोच करत असतो . प्रयत्नांची पराकाष्ठा करून करून तो पुन्हा थकून जातो...आणि शेवटी..कायमचा मिटतो...

तो म्हणजे, परिस्थितीच्या ओझ्याखाली चिरडून गेलेला मनातला प्रेमाचा भाव आहे.
तो म्हणजे, वेळेसोबत निघुन गेलेला एखाद्या व्यक्तीशी लागलेला जिव्हाळा आहे.
तो म्हणजे, आपण मुस्कटून टाकलेल्या कुणाच्यातरी आठवणी आहेत.

त्याचे नाव प्रेम..त्या प्रेमाची दुसरी बाजू म्हणजे त्याग. जिथे प्रेम जाईल तिथे त्याग जातोच.
प्रेम एकटा कधीच येत नाही आणि एकटा जातही नाही.
सर्वांसमोर सर्र्रास प्रेम करणारे भरपूर असतील, पण कुठल्या न कुठल्या कारणासाठी मनातल्या प्रेमाचा आवाज बंद करणारे त्यापेक्षा अधिक असतात. मग ते कारण कधी जात , धर्म, वडीलधारी माणसे , प्रांत, असतं किंवा प्रेम असूनही बोलण्याचे धाडस नसणे किंवा ,प्रेम व्यक्त करण्यात आलेले अपयश असेल किंवा व्यक्त करण्यासाठी कधीच न मिळालेली संधी यापैकी एक असतं.

प्रेम न मिळणे हे जरी एक सत्यकटु असले तरी ते नाही मिळाले म्हणुन स्वतःच्या आयुष्याला कायमच्या निराशेचा पूर्णविराम देणे म्हणजे मूर्खपणाच ! या धडपडणाऱ्या आवाजाला नेहमीच गप्प करणे म्हणजे परत मूर्खपणा...
कधी कधी... कधी कधी... Reviewed by Akshay on 7:04 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.