कला !!




काल एका संगीत अकॅडमी मध्ये गेलो होतो. एक वृद्ध सर ३० वर्षांपासून ती अकॅडमी चालवतात. संगीत शास्त्रातले ते PHD. धारक आहेत. बऱ्याच वेळ त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताच्या गोष्टी ऐकण्याची संधी मिळाली. कलेच्या हजारो गुणांपैकी एका गुणाचे वैशिष्ट्य सरांनी मला एका उदाहरणातून सांगितले. कला जरी आयुष्य जगण्यासाठी तितकी आवश्यक नसली तरी ती दुसऱ्या बाजूने कशी आवश्यक आहे हे त्यांनी त्या उदाहरणातून स्पष्ट केले. ते उदाहरण असे होते .

" एक माणुस अगदी ५ रुपयाचे एक छोटे फुल घेतो. त्याला ते फुल खूप आवडते. तो आनंदी होतो. दुसऱ्यावेळी तो त्यापेक्षा मोठे २० रुपयाचे फुल घेतो. त्याची फुलांमधली आवड वाडत जाते . मग ५० रुपयाचे , १०० रुपयाचे , ५०० रुपयांची बुके असे वेगवेगळ्या प्रकारात तो फुले आणत गेला आणि त्यांच्या सुगंधाचा आणि रंगांचा तो आनंद घेऊ लागला. त्याची फुलातली आवड बघून दुसरा एक माणुस त्याला म्हणतो "FOOL आहेस रे तू. फुलांसाठी पण कोणी इतका खर्च करतो का " ".

यातला पहिला माणुस फुलांच्या सौंदर्याला समजून त्याच्यापासून स्वतःला आनंदी ठेवतो. त्या फुलांची किंमत त्याला कळलेली असते. पण दुसऱ्या माणसाला त्याचं काहीच देणं घेणं नाही. उलट त्याला तो फुल घेणारा fool वाटला.

कला त्याच प्रमाणे आहे. कलेपासून मिळणारा आनंद सर्वात आधी ज्याला ती येते त्याला जास्त जाणवतो.आपल्यातला कलेचा तो आनंद कधी दुसर्यांना जाणवतो तर कधी जाणवत नाही. ते आपल्यातल्या कलेचा आनंद घेऊ शकतात किंवा घेऊ शकत नाहीत अश्या दोनीही गोष्टी होऊ शकतात. आपल्यासाठी ती कला आयुष्यात अगदी आवश्यक झालेली असते आणि तीच कला दुसऱ्या माणसासाठी मुळीच आवश्यक नसते..

मला विचाराल तर कला माणसाला तितकीच आवश्यक असते जितकी त्याला एखाद्या भाषेची गरज असते. फरक फक्त इतकाच कि, भाषेतून संवाद साधताना तो शब्दांचा आधार घेतो आणि कलेतून तू शब्दांशिवाय त्याचा संवाद आणि भावना समोरच्या माणसापर्यंत पोहोचू शकतो . गोड भाषेतून तो माणसांना जिंकू शकतो उत्तम कलेतून तो त्यांच्या मनांना जिंकू शकतो..
कला !! कला !! Reviewed by Akshay on 7:37 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.