आता पुन्हा निवडणुका येणार...काय रे देवा....

संदीप खरे यांच्या "आता पुन्हा पाऊस येणार" ह्या कवितेचा आधार घेऊन तयार केलेली हि कविता...



आता पुन्हा निवडणुका येणार ..
मग रस्ते गजबजून जाणार ..
जय-जयकारांचे भोंगे ऐकू येणार ..
त्यांना आमचे मत हवे असणार ..
म्हणुनच त्यांना आमची आठवण आलेली असणार ..
काय रे देवा...
      मग ते मत आम्ही कुणाला टाकणार हा प्रश्न पडणार ..
      त्यावर रात्रंदिवस चर्चा होणार ..
गल्लो गल्ल्यात मोर्चे निघणार ..
लेख , बातम्या , स्पेशल रेपोर्ट्स लिहिल्या जाणार ..
निवडणूक ड्युट्या चालू होणार ..
      आचारसंहिता लागू होणार ..
      काय रे देवा ....
मग आमचे प्रश्न कुणाला सांगता नाही येणार ..
गुंडांना घाबरून आम्ही गप्प बसणार ..
तरीही ते प्रश्न कुणालातरी कळावे असं वाटणार ..
मग ते कुणीतरी ओळखणार ..
मग मित्र असतील तर हसणार , नातेवाईक असतील तर “काम करा म्हणणार ..
मग “नसतंच कळलं तर बरं” असं वाटणार ..
आणि या सगळ्यांशी त्यांना काहीच देणं घेणं नसणार ..
काय रे देवा ...
उभारलेले सगळेच नेते सारखे वाटणार..
सगळ्यांची खाती तितकीच भरलेली असणार
आदर्श असो , 2G असो की CWG ,  सगळ्यांच्या नावावर एक तरी घोटाळा असणार..
मग आम्ही मनाची तयारी करणार ..
      त्यातल्यात्यात कमी भ्रष्टाला मत टाकू असे ठरवणार...
काय रे देवा... 
मग त्याच वेळी केंद्रात कुणीतरी नव्या योजना जाहीर करणार ..
मग शेतकऱ्यांची , विद्यार्थ्यांची कर्जमाफी होणार ..
मग गरिबांना तांदूळ वाटले जाणार ..
मग त्यात सगळेच मंत्री आपले नाव झळकावणार ..
बघता बघताचित्र बदललेलं असणार ..
आम्ही काहीही ठरवले तरी उलटेच होणार ..
आदल्या रात्री वाटलेल्या दारूच्या बाटल्या , चोरांनाच निवडून आणणार ..
मग उगाच आमच्या छातीत हुरहुरणार ..
काय रे देवा. ..
निवडणुका होणार ,
मग सगळे जण पुन्हा थंड पडणार ..
            सगळे मंत्री संत्री परत झोपी जाणार ..
मग त्यांना खर्चलेल्या पैशांची हाक ऐकू येणार ..
नवे घोटाळे नव्या प्रकरणांना सुरवात होणार ..
दरवाढ , व्याजवाढ परत दुपटीने वाढणार ..
जाहीर केलेल्या  योजनांच्या फाईली केंद्रातच लोळणार ..
शेतकरी मरत राहणार , common man झुरत राहणार ..
मग १ अब्ज २५ कोटी चा देश अपुरा अपुरा वाटणार...
उरी फुटून जावं असा वाटणार,
छाताडातून हृदय काढून त्या सरकारलाच द्यावं वाटणार ..
मग सारच कसं उत्कट उत्कट होत जाणार ..
आम्ही चिडणार , रडणार आणि तक्रार करणार ..
तरीही घोटाळे फक्त कमी जास्त होणार , पण बंद नाही होणार ..
काय रे देवा... 
निवडणुका होणार.
मग सगळीकडे शांतता पसरणार ..
मग आमच्या मनातली निराशा त्या शांततेत जाऊ पाहणार ..
पण मनाला ते नाही जमणार ..
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार ..
वादळा पूर्वीची शांतता आपले रंग दाखवणार ..
डोक्यातलं वादळही तोपर्यंत शांत होणार ..
मग आम्ही परत रोजच्या कामाला लागणार ..
2G , CWG , COALGATE सगळं काही विसरलेलं असणार ..
त्यांच्या जागी ते असणार ..
आमच्या जागी आम्ही असणार ..
पुढच्या मतदानापर्यंत हे असचं चालत राहणार...
या सगळ्यात COMMON MAN मात्र नेहमीसारखाच रगडला जाणार...
काय रे देवा...

               
आता पुन्हा निवडणुका येणार...काय रे देवा.... आता पुन्हा निवडणुका येणार...काय रे देवा.... Reviewed by Akshay on 10:58 PM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.