मला परत शाळेत जाऊ दया रे...



मला परत शाळेत घेऊन चला रे
त्या मैदानावर परत खेळू दया रे
रांगेत थांबुन ढकला ढकली करू दया रे..
मला परत शाळेत जाऊ दया रे..

खो-खोचा तो डाव खेळु दया रे.
परत एकदा खो म्हणु दया रे..
कवायती करून घामाघूम होऊ दया रे
सूर्यनमस्कार घालत दिवस जाऊ दया रे

मागच्या बाकावर बसून समोरच्याची खोड काढू दया रे..
खडु फेकून त्याला परत मारू दया रे
मी उत्तर सांगतो म्हून हात वर करू दया रे..
मला परत शाळेत जाऊ दया रे.

मधल्या सुट्टीत अंगत पंगत करू दया रे.
त्याच्या डब्ब्यातला घास मलापण खाऊ दया रे.
गाड्यावरची बोरं मला पण खाऊ दया रे..
एका रुपयात भेटणारी भेळ मला पण घेऊ दया रे..

छोट्या वहीत परत लिहू दया रे
रंगी बेरंगी पेनांचा खेळ खेळु दया रे.
नव्या पुस्तकांना पुष्टे लाऊ दया रे.
मला परत शाळेत जाऊ दया रे..

स्वच्छ गणवेशाची घडी करू दया रे..
चित्रकला, कार्यानुभव च्या वर्गात परत बसू दया रे.
सायकल वर वेगाने शाळेत पोहोचू दया रे.

दप्तर घेऊन ऐटीत, मला परत शाळेत जाऊ दया रे...
मला परत शाळेत जाऊ दया रे... मला परत शाळेत जाऊ दया रे... Reviewed by Akshay on 1:28 PM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.